मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यिक — डॉ. सुनील सावंत
डॉ. सुनील सावंत हे मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यिक आहेत. त्यांनी १९७५ पासून लेखनास प्रारंभ केला असून त्यांची मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत २१ पुस्तके सन २०२५ पर्यंत प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कविता, कथा, ललित, कादंबरी, नाटक इत्यादी प्रकारांमध्ये लेखन केले आहे.
• एक मराठी संयुक्त काव्यसंग्रह • चार मराठी काव्यसंग्रह • दोन मराठी कथासंग्रह • एक मराठी अनुवादित ललित संग्रह • एक मराठी आध्यात्मिक पुस्तक • चार मराठी संपादित काव्यसंग्रह • एक मराठी संपादित चरित्रात्मक पुस्तक • डॉ. सुनील सावंत यांच्या कवितांवरील समीक्षेचे एक पुस्तक • एक मराठी अनुवादित आध्यात्मिक ग्रंथ • एक हिंदी काव्यसंग्रह • एक हिन्दी आध्यात्मिक पुस्तक • एक हिन्दी शोध ग्रंथ • एक इंग्रजी संपादित ललित पुस्तक • एका मराठी कादंबरीचा इंग्रजी भावानुवाद.
“बैद्यनाथ मिश्र नागार्जुन और मराठी कवी नारायण सुर्वे की कविताओं का तुलनात्मक अध्ययन” या शोध प्रबंधासाठी
मुंबई विद्यापीठाने २००१ साली सुनील सावंत यांस डॉक्टरेट प्रदान केली.
हा शोध प्रबंध मार्गदर्शक डॉ. श्रीभगवान तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सावंत यांनी सहा वर्षात पूर्ण केला.
ह्यात मराठी व हिंदी कवितांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. हा प्रबंध हिंदी भाषेत केलेला आहे. हिंदी व मराठी अभ्यासकांना उपयुक्त आहे.
'अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉंग्रेस' वॉशिंग्टन या अमेरिकेतील लायब्ररीत दरवर्षी विविध पुस्तकांची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड केली जाते.
सन २००७ सालाकरिता 'डॉ. सुनील सावंत : कवी आणि कविता' (शामल वेचलेकर व बाळ राणे लिखित) समीक्षा ग्रंथाची निवड झाली.
ह्यात ज्वालामुखी, माझी वस्ती मी शोधतोय, मैत्रीण, स्वातंत्र्याची हाक, सूर्य दिसत राहिल तोपर्यंत... या पाच काव्यसंग्रहातील कवितांची समीक्षा आहे.
| वर्ष | पुस्तकाचे नाव | प्रकार | प्रकाशक |
|---|---|---|---|
| १९८४ | ज्वालामुखी | काव्यसंग्रह | लोक सांस्कृतिक मंच |
| १९८५ | हर्षदा | कथासंग्रह | पारिजात प्रकाशन |
| १९९० | माझी वस्ती मी शोधतोय | काव्यसंग्रह | वंदना प्रकाशन |
| २००२ | सूर्य दिसत राहील तोपर्यंत ... | काव्यसंग्रह | वंदना प्रकाशन |
| २००४ | ऐलान | हिंदी काव्यसंग्रह | वंदना प्रकाशन |
| पुस्तकांचा सविस्तर परिचय पहाण्यासाठी | |||
कार्यक्रम व छायाचित्रे