साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांच्या पुस्तकांचा सविस्तर परिचय

डॉ. सुनील सावंत हे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील साहित्यिक आहेत. त्यांनी कविता, कथा, ललित, कादंबरी, नाटक इत्यादी प्रकारांमध्ये लेखन केले आहे. त्यांनी १९७५ पासून लेखनास प्रारंभ केला असून त्यांची मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत २१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

• एक मराठी संयुक्त काव्यसंग्रह • चार मराठी काव्यसंग्रह • दोन मराठी कथासंग्रह • एक मराठी अनुवादित ललित संग्रह • एक मराठी आध्यात्मिक पुस्तक • चार मराठी संपादित काव्यसंग्रह • एक मराठी संपादित चरित्रात्मक पुस्तक • डॉ. सुनील सावंत यांच्या कवितांवरील समीक्षेचे एक पुस्तक • एक मराठी अनुवादित आध्यात्मिक ग्रंथ • एक हिंदी काव्यसंग्रह • एक हिन्दी आध्यात्मिक पुस्तक • एक हिन्दी शोध ग्रंथ • एक इंग्रजी संपादित ललित पुस्तक • एका मराठी कादंबरीचा इंग्रजी भावानुवाद.

साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांची प्रसिध्द साहित्य संपदा
क्र. पुस्तकाचे नाव साहित्य प्रकार प्रसिध्दीचा काळ प्रकाशन संस्था व प्रमुख पाहुणे
१)ज्वालामुखी (संयुक्त काव्यसंग्रह)काव्यसंग्रह१९८४लोक सांस्कृतिक मंच, मुंबई – श्री. बाबुराव बागुल
व श्री. शाहिर साबळे
२)हर्षदाकथासंग्रह१९८५पारिजात प्रकाशन, पुणे – श्री. श. ना. नवरे
३)स्नेहबंध (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)काव्यसंग्रह (संपादित)१९८६वंदना प्रकाशन, मुंबई – कवी नारायण सुर्वे
४)माझी वस्ती मी शोधतोयकाव्यसंग्रह१९९०वंदना प्रकाशन, मुंबई – मधु मंगेश कर्णिक
५)स्नेहसोबतीकथासंग्रह१९९७चिंतामणी संस्था, सावंतवाडी – प्र. श्री नेरुरकर
६)मैत्रीणकाव्यसंग्रह१९९७वंदना प्रकाशन, मुंबई – प्र. श्री नेरुरकर
७)स्वातंत्र्याची आसकाव्यसंग्रह (संपादित)१९९८वंदना प्रकाशन, मुंबई – मधु मंगेश कर्णिक
८)स्वातंत्र्याची हाककाव्यसंग्रह१९९८वंदना प्रकाशन, मुंबई – मधु मंगेश कर्णिक
९)प्र. श्री. : एक पंच्याहत्तरीय साठवणचरित्र संपादन१९९८वंदना प्रकाशन, मुंबई – दिनकर गांगल
१०)Mauritius Friend : P. S. NerurkarEdited Book१९९८ग्रंथाली – कोमसाप उद्घाटन
११)कविता विश्वकाव्यसंग्रह (संपादित)१९९९वंदना प्रकाशन, मुंबई – लक्ष्मण लोंढे
१२)विसाव्या शतकातील कविताकाव्यसंग्रह (संपादित)२०००वंदना प्रकाशन, मुंबई – आकाशानंद (दूरदर्शन)
१३)सूर्य दिसत राहील तोपर्यंत ...काव्यसंग्रह२००२ (पहिली आवृत्ती)
२००५ (दुसरी आवृत्ती)
२०२४ (तिसरी आवृत्ती)
वंदना प्रकाशन, मुंबई – नारायण सुर्वे (पहिली आवृत्ती)
वंदना प्रकाशन, मुंबई (दुसरी आवृत्ती)
वंदना प्रकाशन, मुंबई – डॉ. भालचंद्र मुणगेकर (तिसरी आवृत्ती)
१४)डॉ. सुनील सावंत कवी आणि कवितासमीक्षा२००२वंदना प्रकाशन, मुंबई – नारायण सुर्वे
१५)ऐलानहिंदी काव्यसंग्रह२००४वंदना प्रकाशन, मुंबई – मंगेश पाडगावकर
१६)काळे पाणी, लाल सूर्यअनुवाद (हिंदी)२००६वंदना प्रकाशन, मुंबई – प्रभाकर पणशीकर
१७)वैद्यनाथ मिश्र नागार्जुन और नारायण सुर्वेशोध ग्रंथ२००६वंदना प्रकाशन, मुंबई – प्रभाकर पणशीकर
१८)श्री सिद्धिविनायक माहात्म्यआध्यात्मिक२००७वंदना प्रकाशन, मुंबई – जयंत साळगावकर
१९)श्री सिद्धिविनायक महिमाहिंदी२००९वंदना प्रकाशन, मुंबई – प्रभादेवी मंदिर
२०)ईश्वराद्वारे विश्वाच्या संविधानाची पुनर्व्याख्याअनुवाद (मराठी)२०१०वंदना प्रकाशन, मुंबई – वसुंधरा पेंडसे नाईक
२१)SINGE (होरपळ आत्मचरित्राचा इंग्रजी भावानुवाद)अनुवाद२०१८Academic Excellence, New Delhi

सविस्तर परिचय पहाण्यासाठी
सविस्तर जीवनप्रवास पहाण्यासाठी
पुस्तकांचा सविस्तर परिचय पहाण्यासाठी
सविस्तर पुरस्कार आणि सन्मान पहाण्यासाठी