सविस्तर - जीवनप्रवास
डॉ. सुनील सावंत यांचा सविस्तर जीवनप्रवास, जीवनातील महत्त्वाचे टप्पे, साहित्यिक योगदान इत्यादी.
- १९७५: लेखनास प्रारंभ
- १९८१-८२: बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे आयोजित कथाकथन स्पर्धेत प्रोत्साहन पुरस्कार
- १९८४: 'ज्वालामुखी' हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित
- १९८५: 'हर्षदा' कथासंग्रह प्रकाशित
- १९९०: 'माझी वस्ती मी शोधतोय' काव्यसंग्रह प्रकाशित
- १९९७: 'स्नेहसोबती' कथासंग्रहास कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
- १९९७: मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 'आशीर्वाद' पुरस्काराची स्थापना
- २०००: मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा साहित्य योगदान पुरस्कार
- २००१: डॉक्टरेट (पीएच.डी.) – “बैद्यनाथ मिश्र नागार्जुन और मराठी कवी नारायण सुर्वे की कविताओं का तुलनात्मक अध्ययन” या हिंदी भाषेतील प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केली
- २००४: 'ऐलान' काव्यसंग्रहास महानुभाव विश्वभारती, अमरावतीचा 'साहित्यालंकार पुरस्कार'
- २००७: जयंती फाउंडेशन, मुंबईचा 'गौरव चक्र' पुरस्कार
- २००७: आंतरराष्ट्रीय सन्मान – 'अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉंग्रेस' वॉशिंग्टन येथे 'डॉ. सुनील सावंत : कवी आणि कविता' समीक्षा ग्रंथाची निवड
- २००८: 'साहित्य रत्न' पुरस्कार – विद्या मॅनेजमेंट अॅण्ड करीअर डेव्हलपमेन्ट इन्स्टिट्यूट, प्रभादेवी
- २००९: वाङ्मयसेवा प्रकाशन, नाशिक यांचा 'सूर्य दिसत राहिल तोपर्यंत...' काव्यसंग्रहास पुरस्कार
- २०२५: श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, ठाणे यांचा 'काव्य गौरव पुरस्कार'
- २०२५: भिरवंडेकर मराठा समाज, सिंधुदुर्ग जिल्हा यांनी साहित्य क्षेत्रातील कार्याचा विशेष सन्मान
सविस्तर परिचय पहाण्यासाठी
सविस्तर जीवनप्रवास पहाण्यासाठी
पुस्तकांचा सविस्तर परिचय पहाण्यासाठी
सविस्तर पुरस्कार आणि सन्मान पहाण्यासाठी